बिनधास्त, बेधडक, दे दणादण बातम्यासाठी वाचा - झुंजार बातमीदार

Tuesday, June 19, 2012

ही बांबळे स्कूल काय भानगड आहे रे भौ....


नाशिकच्या मेरी परिसरातील आर टी ओ कॉलनीचा चौक. दुपारची 1 ची वेळ.
चौकाच्या बाजूला तीन आलिशान गाड्या थांबलेल्या. सिंघमफेम अजय देवगण,
दबंगफेम सलमान खान आणि राऊडी राठौरफेम अक्षयकुमार रस्त्यावर उभे राहून
पत्रकारीतेच्या बांबळे स्कूलचा पत्ता विचारत आहेत. नाशिककरांना अशा
कोणत्याही स्कूलचे नाव माहित नाही. तीघेजण सांगतात...अरे बाबा या स्कूलचे
चालक एक साखळी दैनिकाचे मुख्यसंपादक आहेत.. सारस्वतांच्या संमेलनाचे ते
अध्यक्ष होते...त्यांच्या मानसपूत्र भाई पैलवानचा फॅन क्लब होता...
कामगार साहित्यिक त्यांचे लहान बाप होते...तर ज्ञानपिठ विजेते त्यांचे
मोठे बाप होते... अशा अनेक खाणा खुणा देवगण, खान व अक्षयकुमार सांगत
होते. मात्र बांबळे स्कूलचा पत्ता काही सापडत नव्हता... तेवढ्यात चौकातला
एक सलूनवाला तेथे आला. त्याने घामाघूम झालेल्या तिघा सुपर हिरोंना ओळखले.
बांबळेंचे वर्णन एकून तो म्हणाला, अरे मी यांना ओळखतो. ते संमेलनाध्यक्ष
झाले तेव्हा या चौकात मीच त्यांचा मोठा फलक लावला होता. नोकरी करताना ते
दुसर्‍यांचे वेतन, नोकर्‍या, बढतीचे पत्ते कापतात. मी मात्र त्यांचे केस
कापतो. ते माझ्या समोर मान खाली घालून बसतात.

बांबळे स्कूलचा पत्ता मिळाला म्हटल्यावर तिघा हिरोंची कळी खुलली.
सलूनवाला त्यांना घेवून बांबळेंच्या घरी गेला. गर्दीही पांगली. आता हे
तिघे हिरो नाशिकमध्ये बांबळे स्कूल का शोधत होते यावर चौकातल्या रिकाम
टेकड्या लोकांचा खल सुरू झाला. थोड्यावेळाने सलूनवाला चौकात परत आला. तो
बांबळेंच्या घरची कहाणी रंगवून स्टोरी सांगू लागला.

तो किस्सा होता असा... गेल्या महिनाभरापासून टीव्हीवर तारे जमीपर वाल्या
अमीर खानचा बोलबाला आहे. स्त्री भ्रूण हत्या, प्रेमविवाह अशा विषयांची
मल्टीमिडिया मांडणी करून अमीरने आपणही सामाजिक जाणीव असलेले पत्रकार
म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्याला लोक अभिनेता, आंदोलक, सामाजिक वर्कर
आणि आता चांगला पत्रकार म्हणून त्याला जगभरात ओळखले जात आहे. ही बाब
देवगण, खान आणि अक्षयकुमारच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी अब हमी
बनेंगे पत्रकार अशी शपथ घेतली. या तिघांनी पत्रकार होण्यासाठी चांगल्या
शाळेचा शोध सुरू केला. मुंबईत इंटरनेटवर जगभरातल्या मीडिया स्कूलची
माहिती मिळविणे सुरू केले. त्यांना कोणतीही स्कूल पसंत पडत नव्हती.
सलमानला फेसबूकवर सर्वाधिक फॅन आहेत. त्यामुळे तो कधीकधी फेसबूकवर चॅटींग
करतो. फेसबूकवर जळगावच्या एका पत्रकाराच्या वाढदिवसाचा फोटो पाहत असताना
कोण्यातरी ज्येष्ठ पत्रकाराने आम्ही नाशिकच्या सर्वोत्तम बांबळे मीडिया
स्कूलमध्ये शिंकल्याचा उल्लेख केलेला होता. सलमानने हा संदर्भ वाचला. तो
देवगणला आणि अक्षयकुमारला सांगितला. झाले हे तिघेही उजाडल्या उजाडल्या
नाशिकमध्ये पोहचले. गंगेवर स्नान करून बांबळे स्कूल शोधू लागले.
अर्धीअधुरी माहिती घेवून मेरीत पोहचले. सुदैवाने मला भेटले. मी त्यांना
बांबळे स्कूलमध्ये नेले. तेथे सध्या ते माझी आई- माझे बाबा याविषयावर
प्राचार्यांशी चर्चा करीत आहे. तिघे आथा जेवूनच जाणार म्हटल्यावर
प्राचार्यांनी मला मटण आणायला सांगितले आहे. सलमान आणि देवगणला मटण आवडते
म्हणे...

सलूनवाला मटण आणायला गेला. तेथील लोकांनीही बांबळे स्कूलची महती सांगून
या स्कूलचे कोण कोण विद्यार्थी मोठे झाले याची जंत्री लावायला सुरवात
केली. मग एकएक नाव पुढे येत गेले. श्रीनिवास हेमाडे, राजीव खांडेकर,
विश्वास देवकर, पांडुरंग गायकवाड, सुधीर कावळे, प्रदीप निफाडकर, श्रीकांत
कात्रे, संजय भालेराव, नितीन भालेराव, रमेश शिंदे, बाबुराव शिंदे, कै.
शिवाजी गायकवाड, यदु जोशी, किरण काळे, अभय सुपेकर, शशी वाघ, दिलीप
तिवारी, बळवंत बोरसे, संपत देवगिरे अशी किती तरी नावे...यापैकी काही जण
केजीपासून विद्यार्थी होते. आज किती जण आज कुठे आहेत ? ते का गेले... कसे
गेले...त्यांना कोणी घालवले... बांबळे स्कूलमध्ये शिकण्यापासून छळ, कपट,
कारस्थान, लाचारी, चमचेगिरी याचेच शिक्षण कसे मिळाले याच्याच कहाण्या
प्रत्येकाच्या नावानिशी रंगू लागल्या. नाशिककरांचा एक स्वभाव गमतीचा
आहे...त्यांना चांगल्या गोष्टी कमी आणि वाऊट गोष्टी फार लवकर आठवतात.
बांबळे स्कूलच्या अशाच वाईट आठवणी रंगू लागल्या. विषय डोक्यापासून
कमरेपर्यंत घसरत गेला. काही महिला विद्यार्थीही बांबळे स्कूलमध्ये
होत्या...त्यांचे काय झाले.. नको येथे चर्चा. विषय भलतीकडेच जातोय.

बांबळे स्कूलचे काही विद्यार्थी आज मोठ्या पदांवर आहेत. नावलौकिक मिळवत
आहेत. प्राचार्य बांबळे मध्यंतरी सारस्वतांच्या संमेलनाचे अध्यक्ष झाले.
विविध माध्यमातून त्यांच्यावर कौतुक सुमने बरसलीत. खरे नावाच्या तरुणाने
मोठ्या मेहनतीने चार पाच प्रकारात तयार केलेला बायोडेटा, सीव्ही आणि
सिझ्यूम विविध पेपरात छापून आला. मात्र, बांबळे यांचे सोबत असलेल्या
एकाही विद्यार्थ्याने आमचे गुरू म्हणून एकही लेख लिहीला नाही. याचेच
आश्चर्य वाटते... कारण बाबंळे यांनी खरोखर विद्यार्थ्यांना काय दिले हाच
प्रश्न शिल्लक राहतो. त्यांच्या विद्यार्थ्यांमधील कर आडनाव असलेल्या
दोघा तिघांशी खासगीत चर्चा केली तरी बांबळे स्कूलने काय दिले याचे वास्तव
समोर येते... अशी आहे भौ ही बांबळे स्कूल...

टोंच्या - या लेखाचे युनीकोडमध्ये ऑपरेटींग करताना काही ठिकाणी क च्या
ऐवजी ब झालेला आहे. इतरही शब्दांमध्ये घोळ झालेला असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नावाविषयी किंवा मजकुरातही घोडचूका होवू शकतात. मीही बांबळे
स्कूलचा विद्यार्थी आहे..