बिनधास्त, बेधडक, दे दणादण बातम्यासाठी वाचा - झुंजार बातमीदार

Wednesday, July 13, 2011

कुठे दी ग्रेट तळवलकर आणि कुठे 'नेट-भेट' वाले? कशी होणार सुवर्ण त्रिकोणात 'प्रगती फास्ट'?

बोरीबंदरच्या टाईम्स नावाच्या वाड्‌यातील  बेनेट एंड कोलमनच्या पूर्वीच्या 'स्मार्ट मित्रा'च्या संपादकाच्या खुर्चीत एक काळ गोविंद तळवलकर  बसायचे.  हा... हा... काय रूबाब होता त्यांचा... जबरदस्त थाट होता...  दबदबा होता त्या माणसाच्या लेखणीचा आणि तत्वांचा... एखाद्या  राजघराण्याचा कर्ता  पुरूष जसा असावा तसा त्या माणसाचा त्या दगडी वाड्‌यातला वावर होता. पण त्याच वाड्‌यावर आज काय वेळ आली... म्हणजे त्याच दगडी भिंतीच्या आत त्या खुर्चीची शोभा, दरारा, वचक पार लयास गेली.  गेले ते दिवस गेले...  जुनी जाणती माणसे त्या वाड्‌यात गेली की या दुर्दशेने त्यांचे डोळे अक्षरश: पानवलतात! 

देशभक्त, स्वातंत्र्यसैनिक मातेच्या संस्काराच्या मुशीत तयार झालेल्या व  सध्या  'प्रचंड खपाच्या एकमेव नि:पक्ष व निर्भीड दैनिका'ची  मुंबईतील धुरा सांभाळणारया गुणी माणसावर तेव्हा बोरीबंदरच्या इमारतीत अन्याय केला गेला. (ती आदरणीय माता नुकतीच स्वर्गवासी झालीय; तिच्या पवित्र स्मृतींना आमचे मन:पूर्वक वंदन)  शिवसेनेतून राज्यसभेत पोहोचून आता नागपूरच्या शेठाकडे पोहोचलेल्या संपादकांनी तेव्हा आपला उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याशी प्रामाणिक असूनही; स्वातंत्र्यसैनिक मातेच्या गुणवान पुत्राला न नेमता एका पार्लेकरांना खुर्चीत बसविले आणि स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला... विडयाच्या पानासारखा दिसणार्‍या माणसाचे खरे रंग काय आहेत ते खासदार, सल्लागार संपादकांना उशिराच कळले. सुरूवातीला आपली खुर्चीवरील पकड घट्‌ट होईपर्यंत या पार्लेकर माणसाने खासदार, सल्लागारांची लाईन चालवली.  नंतर मात्र या पार्लेकराची काय सांगावी महती आणि काय सांगावी 'प्रगती'... हे महाशय चक्क 'खेले'ताहेत इष्काचे 'बाण'... संपादकाने आपल्याच केबिनसोर बसलेल्या एखाद्या बाईला खरे तर थेट केबिनमध्ये बोलावून 'संवाद'  साधावा; तर हे टेक्नोसेव्ही महाशय आपल्याच हाताखालील बाईंशी चॅटवरून 'संवाद' साधतात आणि रविवारची संवाद पुरवणी हिट होते, याची महती गात बसतात. 'स्मार्ट मित्रा'च्या इतिहासात प्रथमच एखादा अग्रलेख अथवा स्फुट अथवा चिंतन न लिहिणारा संपादक नशिबी आलाय. आता शाळकरी मुलांनाही माहिती असलेल्या फुटकळ संगणकीय व नेट टिप्स हे महाशय 'नेट-भेट' या बालसदरातून देत होते. जे काम एव्हढा ज्येष्ठ पत्रकार करायचा तेच आता बालिश नीरज पंडित आणि हर्षल मळेकर करतायेत. 

वरिष्ठ पत्रकाराचे लिखाण एव्हढे फुटकळ, स्वस्त, तकलादू आणि ट्रेनी पोरांनी वारसा चालवावा असे असू नये. हे म्हणजे 'वेल्थ' साप्ताहिकातील दोन आठवड्यांपूर्वीचे लिखाण भाषांतर करून 'महाराष्ट्राच्या मानबिंदू'त पान १ वर छापण्यासारखे झाले. (अशी आर्थिक चोरीमारी नेहमी होते!; तीही याच मानाबिंदूत. एखादा मठ्ठ मुनीम-दीवाण आणि जो धड आपलाही पेपर नीट वाचत नाही असा संपादक असला तर त्याला कुणीही एक्स्लुझिव्ह म्हणून शेंडी लावणारच . पण मग बढती मिळालेल्या रंगीला औरंगा बादी साहेबाचा तरी 'विवेक' जागृत असावा ना! आमच्या माहितीनुसार, या माणसाला एखाद्या रिपोर्टर ने शेंडी लावणे कठीणच. असो. रात्रीची सोय व्हावी म्हणून त्यांच्या गॉन ड फादरची 'सेटिंग' असावी काहीतरी.) तर मुद्दा होता, की तळवलकरांच्या खुर्चीत बसलेल्या संपादकाचे लिखाण तो वारसा पोराटोरांनी चालवावा एव्हढे स्वस्त नसावे. पत्रकारितेत दोन राऊत आहेत. एक तर जबरदस्त! सांगा बरे कुणी फार मी म्हटले तरी 'सच्चाई' आणि 'रोख-ठोक' ची कॉपी जमेल का कुणाला? त्याच्या सात पिढ्या खाली याव्या लागतील. काय जबरदस्त स्टाईल आहे... बाळासाहेबांच्या काळातील कुठलाही जुना अंक काढा आणि आताचा काढा... तीच स्टाईल, तीच धार, तोच विखार... काय शब्दावर पकड आहे, काय हुकुमत आहे. एकेक पीस म्हणजे मास्टरपीस ... तो सचिन असेल मैदानावरचा मास्टर ब्लास्टर ... निळूभाउ सोडले तर हे भांडूपवालेच आता खरे अग्रलेखांचे बादशहा आहेत. असे वाटते की, थेट 'मातोश्री'वरून 'मोठे साहेब'च डिक्टेट करताहेत अजून ... याला म्हणतात स्टाईल ... 

फक्त सच्चाई' आणि 'रोख-ठोक'च नव्हे तर 'मन:पूर्वक'चीही एक स्टाईल आहे. दुसरे राऊतही स्टाईलिश आणि युनिक आहेत. बोरीबंदरच्या मराठी भावंडाला तरुण, देखणा करण्यात; अप-टू- डेट करण्यात, त्याचे रंगरूप काळाला अनुसरून देखणे करण्यात याच राऊतांचा मोलाचा वाटा आहे. फक्त त्यांनी आपली जहागिरी चुकीच्या माणसाला हस्तांतरित केली. योग्य माणूस सानपाडा, चीराबाझार अशा चक्रात बिचारा पार पिसून निघतोय आणि तकलादू, दुबळी माणसे एव्हढ्या मोठ्या पदाची रया घालावीत 'चाटा-चाटी'त (इंग्रजी चाट करण्याचे खरे मराठी रूप!) मग्न आहेत. हे महाशय जेव्हा पाहावे तेव्हा आपले संगणकात 'चाटताहेत, चाटताहेत.....' अरे कुणाला चाटताहेत? आपले पद काय, आपल्याकडून जगभरातील मराठी जनांच्या, अभिजनांच्या अपेक्षा काय? आणि आपण आपले खुश्शाल एक शब्द न लिहिता नको तिथे 'संवाद' साधत बसलाहेत!  आहे, तिथे आपली 'प्रगती फास्ट' आहे. पण हे बरोबर नाही राव! आपल्या प्रतिभेचा सुगंध, पदाची जरब कशी पाना-पानावर वलवलायला... सॉरी वळवळायला...  सॉरी दरवळायला हवी. आपल्या दैनिकाची सुवर्णत्रिकोणात कशी अशोकाच्या झाडासारखी सारासार, झरझर, उंचच उंच प्रगती व्हायला हवी. समस्त मराठी दैनिकावर अग्रवालशेठच्या 'दिव्य' मार्केटिंग तंत्राचा कोप होतोय. भूमिपुत्रांची दैनिके खतरयात आहेत आणि आपण आपले चाटा-चाटी'त मग्न?   

बरे एक वेळ 'चाटा-चाटी' परवडली हो; ती तुमची खासगी भानगड आहे. (अर्थात यालाही अनेकांचा आक्षेप आहे. संपादक म्हणजे सार्वजनिक व्यक्तिमत्व. त्यात बेनेट-कोलमनच्या इमारतीतील असेल तर महाराष्ट्राचे महावैभव! त्याने आपल्या चारित्र्याची काळजी घ्यायलाच हवी. त्यामुळे त्याला खासगी भानगडींची मुभा नाहीच!!) तर आपल्याच कार्यालयात पदाचा गैरवापर व गैरफायदा घेत सब ऑर्डीनेटशी 'चाटा-चाटी' हा एक या सार्वजनिक व्यक्तिमत्वाचा पहिला अक्षम्य अपराध. आजवर मुंबई तील कुणा संपादकाने असा प्रकार केला नव्हता. पदाचा गैरवापर व गैरफायदा घेत सब ऑर्डीनेटशी 'नको ते वर्तन' करणारा एक डाग आहेच. मात्र, 'विवेक'हीन वर्तन करणारे हे पार्सल औरंगाबादेतून आलेय. त्याला मुंबईत कुणी खिजगणतीतही घेत नाही.  आता मात्र बोरीबंदरचाच संपादक असा 'विवेक' गमावू लागला तर मराठी पत्रकारितेला अ'शोक'च होईल. (शोकही करता येणार नाही इतकी वाइट स्थिती)   

'चाटा-चाटी'चे पाप करून पदाची रया घालविणाऱ्या या संपादकाचे दुसरे एक ताजे प्रकरण तर लंगोटी साप्ताहिकाच्या पीत-संपादकांनाही लाज वाटावे असे आहे.  या बोरीबंदरवाल्या संपादकांची एक नाही अनेक लफडी हाती आली आहेत. त्या सर्व चोर्‍या आम्ही उघड करू शकतो... मांजरी सारखे घारे डोळे असणार्‍यांना दूधही पिता येत नाही आणि तळवकलकरांसारखा गोरा रंग असला तरी विचारांनी ब्रिटीशही होता येत नाही... आपल्याच मुलीचे साधे  एडमिशनही करता येत नाही. खरंतर या दैनिकांचा मुंबईतील दबदबा केवढा... त्यांनी ठरवले तर पार्ल्यातील मिठीबाई कॉलेजचे संचालक  असणार्‍या शिरापुरातील  पटेलांना बोरीबंदर  ऑफीसमध्ये  बोलावून घेऊन ऍडमीशन करता आले असते. पण ते त्यांना जमले नाही. आमच्या तात्याबांनीही हे काम सहज केले असते. (कोल्हापूर जिल्ह्यातील हा प्रामाणिक मेहनती मुलगा; एज्युकेशन बीटवर कष्ट उपसले त्याने. मात्र गिरीशरावाना हे 'कुबेर' टिकविता आले नाही. त्याची 'सकाळ' आता भलतीकडेच होतेय!) 

तर स्वत: महाराष्ट्राच्या नंबर एक (इतर मानबिंदू दावा करतात एकचा ते सोडा) दैनिकाचा संपादक आपल्या मुलीचे एडमिशन थेट करू शकत नाही, हे दुर्दैव. मग यांचे गलेलठ्ठ पगार घेणारे वार्ताहर करतात काय? अहो आमच्या ( सॉरी तुमच्याच- वार्ताहर ना ते तुमचे) धुळ्यातील संजय झेंडेना सांगितले असते तरी त्यांनी केले असते थेट हे काम!  तर मुलीचे थेट एडमिशन न करू शकलेले हे संपादक मग हे कंत्राट इतरत्र सोपवितात. तर ते आले ठाण्यातील एका दाढीवाल्या शिवसेना आमदाराकडे!  अर्थात तेही त्यांनी  स्वतः  केले नाही. म्हाडा आणि एमएमआरडीए करणारे एक काळे 'मांजरे'  आणि साहेबाचे ढुंगण खाजवत शहराचा संपादक झालेल्या एक टक्कलवाल्या माकडा'मुळये' बोरीबंदरवाले  संपादक ठाण्यातील आमदारापर्यंत पोहचले. यात काळ्या मांजराचा काय स्वार्थ तुम्ही विचाराल... अहो सरळ आहे त्यांना आता मंत्रालय आणि पॉलिटीकलची स्वप्न पडू लागलेत.... तुम्ही म्हणाल कशा'मुळये'...  काळ्या मांजरामुळयेच.. शहर संपादक खूष आणि पुढे शहर संपादकामुळयें  बोरीबंदरचे  मोठे संपादक काम झाल्यावर खूष! तर साहेबांना खुश करो आणि प्रमोशन मिळो  ... असा त्यांचा ब्राम्हणी बाणा आहेच. 

झाले आता मिशन ऍडमिशन ठाण्यात येऊन ठेपले. मग ठाणे जिल्हाप्रमुख, सोबत ठाण्याचे खासदारही बोरीबंदाराच्या संपादकाच्या मुलीच्या प्रवेशाचे काम म्हणून आनंदाने शिरपूरच्या भाईंकडे जाऊन ठेपले. पण दोघेच नव्हते. त्यांच्यासोबत होता आणखी एक!   ठाण्याचे संस्थानिक स्वतः एवढया फौज-फाट्यासह   आल्यामुळे बिचारे पूर्वी शिक्षणमंत्री राहिलेले शिरपूरचे भाईही भारावले.   मग काय त्यांनी डोनेशनशिवाय  ऍडमिशनचा शब्द तर दिलाय... आता पाहूया पुढे काय होते ते.... मुलीचे ऍडमिशन झाले की 'मांजरा'चे 'कर' फुरफुरणार.. त्याचे 'म्हाडा'तून मंत्रालयात सिमोल्लंघनही नक्की... बरे ज्याच्या'मुळये' बोरीबंदरचे संपादक ठाण्याच्या आमदारापर्यंत पोहोचले त्याचीही  पगारवाढ नक्की आहेच की. 


ता. क. : शिरपूरचे भाई नुकतेच ' 'गोल्ड रिफायनरी'त भेटले. ते खांद्यावर हात टाकून म्हणाले, अहो माझ्याकडे गावातला वार्ताहर थेट आला तरी मी त्याचे काम करतो. बोरीबंदरचा संपादक तर केव्हढा मोठा माणूस; महाराष्ट्रात नंबर एक! त्यांनी आम्हाला थेट फोन केला असता किंवा धुळे-नाशिकच्या वार्ताहरामार्फत सांगितले असते तरी केले असते की. उगाच शिवसेनेची माणसे आली; ती आता क्रेडीट घेणार.   कधीकधी फिल्डवर वावरलेले संपादक नसले तर असे घोळ होतात आणि मग मध्यस्थी बनेल स्टाफवाले फायदा घेतात..

No comments:

Post a Comment